बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे !

    दिनांक  01-Nov-2019 12:40:45
|


 


बेळगाव : १ नोव्हेंबर म्हणजेच बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात येत आहे. यानिमित्त सीमाभागातील हजारो बांधव एकत्र आले आहेत. कारवार, भालकी, निप्पाणी आदींसह संयुक्त महाराष्ट्र पुन्हा झाला पाहीजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. काळे ध्वज, काळा पेहराव परिधान करत आज निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महिलावर्गासह अबाल वृद्धांचा यात सहभाग होता. विविध ठिकाणी फलकबाजी करत आजच्या दिवशी निषेध व्यक्त करण्यात आला.

 

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्याच दिवशी बेळगावसह ४० लाख मराठी नागरिकांची गावे कर्नाटकमध्ये विभागण्यात आले. यात प्रामुख्याने निप्पाणी, बिदर, भालकी, कारवार, संतपूर गावांना महाराष्ट्रात सामाविष्ट करून घेण्यत यावे यासाठी आंदोलने करण्यात आली. अनेकजण हुतात्मे झाले. मात्र, अद्यापही हा प्रश्न प्रलंबित असल्याने सीमाभागातील मराठी बांधव एकत्र येत याच दिवशी येत या विभाजनाचा निषेध व्यक्त करतात. दरम्यान, सीमाप्रश्नांवरील सर्व प्रकरणे अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.