धर्मांतरास अवरोध निर्माण करणारी श्रीहरी सत्संग समिती

    दिनांक  01-Nov-2019 20:21:33   
|

सर्वव्यापक आणि सहिष्णू असणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म
. या धर्मावर इतिहास काळातदेखील अनेक आक्रमणे झालीत आणि आजही काही विशिष्ट पंथांच्या माध्यमातून धर्मांतरण चळवळ चालवत शांततेत आक्रमण होत आहे. विशेषत: ग्रामीण आणि वनवासी भागात होणार्‍या धर्मांतरास अवरोध करण्याचे कार्य श्रीहरी सत्संग समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सध्या गोदाकाठी सुरू असलेल्या या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून जाणून घेतलेले या समितीचे कार्य.नाशिक येथील औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या महामृत्युंजय मंदिरात श्रीहरी सत्संग समितीचे प्रशिक्षण शिबीर सध्या सुरू आहे
. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे प्रशिक्षण चालणार असून मध्य प्रदेशमधील साधक येथे श्रीरामचरित्रमानस, हरिपाठ, भगवद्गीता यांसारख्या आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास येथील साधक सध्या करत आहेत. प्रभू रामचंद्रांचा सहवास लाभलेले आणि तीर्थक्षेत्र असलेले नाशिक यासाठी खास निवडण्यात आले आहे. या समितीच्या कार्याबाबत माहिती देताना येथील शिक्षक नंदकुमार पारस यांनी सांगितले की, “ही सत्संग समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा आहे. श्यामजी गुप्ता यांनी १९९५ मध्ये या अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी या समितीचे प्रथम सत्र हे अयोध्येत पार पडले. यावेळी या सत्रात झारखंड येथील ग्रामीण भागातून साधक सहभागी झाले होते. यावेळी सहभागी वनवासी बांधवांना रामकथा प्रभावीपणे आणि अभ्यासपूर्ण सादर करण्याचे खास प्रशिक्षण दिले गेले. १९९५ ते २०१९ या काळात आजवर ३० ते ३२ प्रशिक्षण वर्ग या माध्यमातून पार पडले आहेत.या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून महिला व पुरुष अशा दोहोंना प्रशिक्षण दिले जाते
. यासाठी १८ ते ३५ हा वयोगट निर्धारित करण्यात आला असून १० वी ते १२ पर्यंतचे शिक्षण व हिंदी भाषा वाचता येणे, ही योग्यता निर्धारित करण्यात आली आहे. अशा प्रकारचे केंद्र अयोध्या, वृंदावन, नागपूर, नाशिक, नवदीप (आसाम) येथे सध्या सुरू आहे. गोदाकाठी सध्या सुरू असलेल्या या प्रशिक्षण वर्गात मध्य प्रदेशमधील २७ विद्यार्थी आले आहेत. या केंद्राचे भविष्यात स्थायी केंद्रदेखील नाशिकमध्ये साकारण्याचा समितीचा मानस आहे. येथून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी (साधक) हे महिन्यातील १५ ते २० दिवस श्रीहरी सत्संग समितीच्या कार्यास देत असतात. एका विद्यार्थ्यावर ३० गावांची जबाबदारी सोपविण्यात येत असते. एक दिवस एक गाव याप्रमाणे त्या गावात थांबून संपर्क केले जातात. तेथे, भागवत, सुंदरकांडपाठ, रामकथा, भजन लोकांना ऐकविले जाते.हे सर्व कार्य करण्यामागे उद्देश काय याबाबत जाणून घेतले असता
, हे साधक मोठ्या आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने सांगतात की, समाजात आजही काही पंथ हिंदू धर्मीयांचे धर्मांतरण करण्याचे कार्य करत आहेत आणि यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चनधर्मीय लोक सहभागी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जे ख्रिश्चनधर्मीय हिंदू धर्मीयांना प्रलोभन देत आहेत व त्यामुळे हिंदूधर्मीय ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्राधान्य देत आहेत किंवा आपल्या मुलांना त्यांच्या शाळेत शिकविण्यास प्राधान्य देतात व ज्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रचार होण्यास मदत होते. अशा सर्व बाबींना अवरोध करण्यासाठी हिंदू धर्माचा गौरवपूर्ण इतिहास, हिंदू देवदेवता यांची महती, हिंदू धर्मग्रंथांचे महत्त्व व त्यातील नोंदी वनवासी आणि ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हिंदू धर्माची समाजातील शेवटच्या घटकाला शास्त्रीय माहिती पोहोचविली जात आहे.तसेच
, लोकांना समजणार्‍या भाषेत ही माहिती दिली जात असल्याने ती माहिती समजण्याबरोबरच त्यांच्या हृदयातदेखील यामुळे हिंदू धर्मास स्थान मिळण्यास मदत होते. तसेच, व्यसनमुक्ती, समूहभाव जागृत करण्याचे कार्यदेखील या समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याशिवाय खेळ, आरोग्य, ग्रामविकास, जैविक शेती, जैविक खाद्य, स्वाभिमान जागरण, शासकीय योजनांची माहिती त्या प्राप्त करण्याकरिता करावयाचे कार्य, संस्कार शिक्षा आदी कार्यदेखील भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी केले जाते. हिंदू धर्माबाबत ज्या अफवा पसरविल्या जातात, त्यांना प्रतिरोध म्हणून समितीच्या माध्यमातून लोकांना यथार्थ सांगितला जातो. पर्वतीय क्षेत्रातदेखील जाऊन कार्य केले जाते. यामुळे लोकांच्या मनात हिंदू धर्माबद्दल आस्था व प्रेम निर्माण होण्यास मदत होते. आज वनवासी क्षेत्रात धर्मांतरण होत असल्याने आम्ही तेथे कार्य करतो, सनातन भारतबद्दल, हिंदुत्वाबद्दल माहिती देतो, हिंदू धर्म व इतर धर्मातील फरक विशद करतो, धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा फायदा घेत काही लोक हिंदू धर्मात फूट पाडत असल्याचे येथील विद्यार्थी आवर्जून सांगतात. नाशिकमध्ये सुरू असलेला हा प्रशिक्षण वर्ग खर्‍या अर्थाने प्रेरणादायी आहे.


असे केले जाते धर्मांतरण


धर्मांतरण करण्यासाठी कशी युक्ती वापरली जाते
, याचे अनुभव येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. उदाहरणार्थ, मिशनरी शाळेच्या गाडीत सर्वधर्मीय विद्यार्थी बसलेले असतात. मात्र, मध्येच गाडीचा चालक गाडी बंद करतो व मुलांना गाडी सुरू होण्यासाठी आपल्या देवाची प्रार्थना करावयास सांगितले जाते. जेव्हा ख्रिश्चनेतर देवाची प्रार्थना केली जाते, तेव्हा गाडी सुरू केली जात नाही व तेव्हा हिंदू देव मदतीला धावून येत नाही. आता ख्रिश्चन धर्मानुसार प्रार्थना करा, असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते, तेव्हा तो चालक गाडी सुरू करतो. यामुळे बालमनावरच हिंदू धर्माचा पगडा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे मुलांच्या मानसिकतेत बदल घडून येतो. मुले हिंदू धर्माऐवजी ख्रिश्चन धर्माचे आचरण करू लागतात. अशा घटना घडू नये यासाठी श्रीहरी सत्संग समिती जागरूकता करत आहे. तसेच, वनवासी क्षेत्रात कोणी आजरी असल्यास ख्रिश्चनधर्मीय त्यांच्या घरी जातात, आजाराची संपूर्ण माहिती घेतात व रविवारी येऊन त्यांना आजारावर मात करणार्‍या गोळीचे चूर्ण देतात व लोकांना बरे करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावयास लावतात, हे रोखण्यासाठी येथील विद्यार्थी जनजागृती करत आहेत.