ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

    दिनांक  09-Oct-2019 16:51:41रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक आणि समांतर रंगभूमीचे आधारस्तंभ असलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीच्या प्रसार आणि विकासासाठी दिलेले योगदान हे बहुमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने नाट्यक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरुण काकडे यांनी आपल्या आयुष्याची ६० वर्षांहून जास्त रंगभूमीसाठी व्यतीत केली. त्यांच्या या असामान्य योगदानामुळे ९४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेच्या 'अमका' या आत्मचरित्राला वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि त्यांचे कौतुक देखील मिळाले.

कित्येक मातब्बर कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी ज्या संस्थेने एक रंगमंच उपलब्ध करून दिला अशा अविष्कार नाट्यसंस्थेचे अरुण काकडे हे आधारस्तंभ होते. अगदी वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत ते रंगभूमीसाठी झटले. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी ते कायमच प्रत्येकाच्या आठवणीत राहतील.