प्रियांका चोप्रा 'या' शोमध्ये ठरणार झळकणारी पहिली भारतीय स्टार

09 Oct 2019 12:48:13


भारतातच नाही तर क्वांटिको या आपल्या विशेष सीरिजने भारताबाहेर सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या प्रियांका चोप्राने यशाचे आणखी एक मानक पार केले आहे. प्रियांका चोप्रा 'बिहाइंड द ट्विट्स' या नावाजलेल्या टॉक शोमध्ये आमंत्रित करण्यात आलेली ती ही पहिली भारतीय स्टार ठरली. सध्या प्रियांका 'द स्काय इस पिंक' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे पण आज जाहीर झालेल्या या आनंदाच्या बातमीमुळे तिच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे.

दरम्यान प्रियांका सध्या न्यू यॉर्कमध्ये तिच्या काही महत्वाच्या कामांसाठी गेली असून याआधी देखील तिने हॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या आधी जोनास ब्रदर्सनी या शोमध्ये झळकले होते आणि आता आपल्या लाडक्या देसी गर्ल प्रियांका चोप्राला या शोमध्ये पाहण्यास सगळेच जण उत्सुक आहेत. 'बिहाइंड द ट्विट्स' या शोमध्ये प्रियांका चोप्राला तिचे ट्विटरवरील विशेष वन लाइनर्स, निक जोनासबरोबर नुकताच सुरु झालेला संसार आणि आगामी चित्रपट 'द स्काय इस पिंक' या चित्रपटावरच्या गप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

प्रियांका चोप्रा या आधी देखील 'जिमी फॅलन शो', 'एलन डीजेनेरस शो' अशा विविध नावाजलेल्या टॉक शोज मध्ये झळकली आहे. आता या आणखी एका प्रसिद्ध शोमध्ये हजेरी लावण्यास ती उत्सुक असल्याचे तिने आपल्या ट्विटरवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0