गणपत गायकवाड यांनी वाढवला प्रचाराचा नारळ

    दिनांक  09-Oct-2019 17:47:55
|
 


कल्याण : कल्याण पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी बुधवारी रॅलीचे आयोजन करत प्रचाराचा नारळ फोडला. तिसगाव ग्रामस्थ आणि भाजपचे, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी आणि बहुसंख्येने कार्यकर्त्यांसह आदिशक्ती तिसाई देवीचे आशीर्वाद घेतले.

 

दोनवेळा अपक्ष उमेदवारी लढवणारे गायकवाड आता महायुतीतर्फे रिंगणात आहेत. विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांची स्वतःचा मतदारसंघ मजबूत करण्याची तयारी केली होती. बंडखोरी झाली तरी, गेल्या निवडणुकीतील ३६ हजारपेक्षा जास्तमते मिळवून गणपत गायकवाड यांनी निवडणून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

 

कल्याण पश्चिमेत युतीचे अधिकृत शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या समोर भाजपचे नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली तर कल्याण पूर्वेतली युतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार गणपत गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बाडारे हे आव्हान उभे करू पाहत आहेत. पण त्यांच्या मुळे आम्हाला काही फरक पडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.