'भूल भुल्लैय्या २' च्या शूटिंगचा शुभारंभ

09 Oct 2019 14:41:59


किआरा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेल्या 'भूल भुल्लैय्या २' च्या चित्रीकरणाचा आज शुभारंभ झाला. किआरा अडवाणीने याविषयी एक बुमरँग करून चाहत्यांना ही बातमी दिली. अनीज बज्मी दिग्दर्शित 'भूल भुल्लैय्या २' चित्रपटाची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. या पूर्वी चित्रपटाचे टीजर पोस्टर आणि कार्तिक आर्यनच्या चित्रपटातील भूमिकेची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.

दरम्यान कार्तिक आर्यनने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट 'पती पत्नी और वो' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे तर 'लव आजकल' चा सिक्वल देखील आगामी काळात येणार आहे. किआरा अडवाणी लक्ष्मी बॉम्ब, गुड न्यूज आणि शेरशहा या चित्रपटांसाठी काम करत आहे.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या 'भूल भुल्लैय्या' च्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यातील अक्षय कुमारच्या अभिनयाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्यामुळे आता त्याचीच भूमिका करणाऱ्या कार्तिक आर्यन ला या चित्रपटासाठी कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.

Powered By Sangraha 9.0