‘विकी वेलिंगकर’मधील ‘मास्क मॅन’ मागील चेहरा कोणाचा ?

08 Oct 2019 15:48:49


 


मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच
मास्क मॅनअशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. विकी वेलिंगकरया आगामी चित्रपटामध्ये मास्क मॅनची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स खूपच वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती ६ डिसेंबर २०१९ रोजी विकी वेलिंगकरप्रदर्शित होईपर्यत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.

जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे या चित्रपटाची प्रस्तुती प्रणय चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्याने करत आहेत. विकी वेलिंगकरचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईत विकी वेलिंगकरचे पोस्टर प्रकाशित केले. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. या मुखवट्यामागे नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. मात्र ही मराठीतील अनोखी संकल्पना असल्याचे प्रत्येकानेच मान्य केले आहे.

मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे मॅनकॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. मास्क मॅनही व्यक्तिरेखा या विकी वेलिंगकरच्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र चांगल्याचा वाईटावर विजय होतो का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत वाट पहावी लागेल,” असे उद्गार या चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. वर्मा यांनी यापूर्वी मिकी व्हायरस’, ‘7 अवर्स टू गोआणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही,” असेही सौरभ वर्मा यांनी म्हटले.

या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. मास्क मॅनहा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे विकी वेलिंगकरय चित्रप्तच शेवट अनंद्दयि होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मंगळवारी प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा कुप्रवृत्ती मुखवट्यामागे लपू शकत नाहीअशाच आशयाची आहे, असेही दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0