"आधी तुमच्यातील रावणाचा वध करा" : पाक मंत्री ट्विटरवर ट्रोल

    दिनांक  08-Oct-2019 14:54:05
इस्लामाबाद
: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांना नेटीझन्सनी पुन्हा ट्रोल केले. विजयादशमीनिमित्त ट्विट करत त्यांनी पाकिस्तान आणि भारतातील हिंदूंना शुभेच्छा दिल्या. मात्र, नेटीझन्सनी त्यांना हाफीद सईदसारख्या रावणाचा आधी वध करा, असा सल्ला दिला. भारताप्रमाणे मंगळवारी पाकिस्तानातही दसरा साजरा करण्यात येणार आहे.


 

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि पाकिस्तानातील हिंदूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांना ट्विटकरांनी झोडपले. पाकिस्तानात सुरू असलेल्या धर्मांतरणाला थांबवा, निर्दोष हिंदू आणि शीखांवर होणारे अत्याचार थांबवा, भारतात दहशतवादी पाठवणे आधी बंद करा, मग शुभेच्छा द्या. दसऱ्याला रावणदहनानिमित्त आम्ही वाईट प्रवृत्तींचा नाश करतो, तसेच तुम्हीही हाफीस सईद, मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांना संपवा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, असा टोलाही त्यांना दहशतवाद्यांनी लगावला.