...तर तूर्की अर्थव्यवस्था नष्ट करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

    दिनांक  08-Oct-2019 14:50:05


 


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला उघड धमकी दिली आहे. 'उत्तर सिरियातून अमेरिकेने सैन्य हटवल्यानंतरही आपल्या हरकती न थांबवल्यास तुर्कीची अर्थव्यवस्था कोलमडून टाकू,', असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

 

सध्या तैनात असलेले अमेरिकन सैन्य या भागातून हटले तर तुर्कीच्या सीमाभागात असलेल्या कुर्दांवर हल्ला होऊ शकतो. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने आम्ही हल्ल्यासाठी कधीही तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकन सैन्य हटवण्याचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाबद्दल टीका केली जात आहे. मात्र, ट्रम्प यांनी तुर्कीला थेट इशारा दिला आहे.