विजयादशमीनिमित्त कलाकारांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

08 Oct 2019 13:09:10


विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. आजच्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला त्यामुळे असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा, अधर्मावर धर्माचा विजय झाला. त्यामुळे आजचा हा दिवस देशभरउत्साहाने साजरा केला जातो. मग यामध्ये आपली कलाकारमंडळी सुद्धा मागे नाहीत. बॉलिवूड, मराठी चित्रपट सृष्टी, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून विजयादशमीनिमित्त ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  


हेमा मालिनी, ऋषी कपूरअनिल कपूर आयुषमान खुराना, सोनम कपूर-अहुजा, विवेक ओबेरॉयगायक अदनान सामी, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूडमधील कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे देशातच नाही तर देशाबाहेरसुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.


तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी सुद्धा चाहत्यांना त्यांच्या अंदाजात विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. सुबोध भावे यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचा एक सुंदर फोटो टाकून शुभेच्छा दिल्या तर सिद्धार्थ जाधवने सुद्धा विजयदशमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0