९८व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे पोहोचले रा.स्व.संघाच्या पथसंचलनाला

    दिनांक  08-Oct-2019 13:55:42पुणे : विजयादशमीनिमित्त रा. स्व. संघाच्या पथसंचलनाचा कार्यक्रम देशभरात पार पडला. दरम्यान, पुण्यातील रा. स्व. संघाच्या पथसंचलनाला महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही विशेष उपस्थिती लावली. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी संचलनाला उपस्थिती दर्शविल्यामुळे त्यांच्या या उत्साहाचे कौतुक केले जात आहे.

 

बाबासाहेब पुरंदरे यांचा विजयादशमी उत्सवातील हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील पर्वती लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनाला पुरंदरेंनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी बाबासाहेब यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.