शस्त्रपूजा करून पहिले राफेल भारताच्या ताफ्यात दाखल

    दिनांक  08-Oct-2019 19:13:23


पॅरिस: भारतीय हवाई दलाचे बळ वाढविणारे पहिले राफेल विमान फ्रान्सकडून भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हे विमान ताब्यात घेतले. थोड्याच वेळात राजनाथ सिंग या विमानातून उड्डाण करतील. यावेळी बोलताना राजनाथ सिंग म्हणले, " आजचा दिवस विशेष आहे कारण आज भारताच्या हवाई दलाचा ८७ वा स्थापन दिवस आहे.

३६ राफेल विमानांसाठी २०१६ मध्ये फ्रान्ससोबत करार करण्यात आला होता. भारत फ्रान्स यांच्यातील राजकीय संबंध अधिक मजबूत होता आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्याने भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार आहे." शस्त्रपूजा करून राजनाथ सिंग यांनी राफेलमधून उड्डाण केले. शस्त्रपूजा आणि भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी वेगळे एअरबेस बनविण्यात आले आहे.