'दबंग ३' च्या व्हिलनचा फर्स्ट लूक प्रदर्शित

08 Oct 2019 17:37:44


प्रभू देवा दिग्दर्शित 'दबंग ३' च्या शूटिंगचा नुकताच पॅक अप झाला आणि सलमान खानने त्याप्रसंगी केलेला एक व्हिडीओ काल व्हायरल होत होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा 'दबंग ३' ची चर्चा सगळीकडे रंगली आहे. याचे कारण म्हणजे 'दबंग ३' मधला व्हिलन किच्चा सुदीप याचा चित्रपटातील फर्स्ट लूक आज प्रदर्शित झाला. आज दसऱ्याच्या निमित्ताने चित्रपटातील रावणाचे दर्शन त्यामुळे चाहत्यांना झाले असेच म्हणावे लागेल.

किच्चा सुदीप च्या या पोस्टरमध्ये त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे. त्याच्या या लुकला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या हा किच्चा सुदीपच्या या लुकचा हॅशटॅग ट्रेंडिंग त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

'दबंग ३' मध्ये किच्चा सुदीप बरोबरच सलमान खान, अरबाज खान, निखिल द्विवेदी हे अन्य कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. येत्या २० डिसेम्बरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Powered By Sangraha 9.0