८७वा वर्धापन दिन : भारतीय वायूदलाकडून चित्तथरारक प्रदर्शन

08 Oct 2019 11:15:56


 


नवी दिल्ली : मंगळवारी भारतीय वायुदलाच्या ८७ वा वर्धापन दिन साजरा केला. याचेच औचित्य साधून गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेनेचे जवान लडाऊ विमानांसोबत प्रात्यक्षिक करून दाखवले. हिंडन एअरफोर्स स्टेशनवर पहिल्यांदाच लढावू हेलिकॉफ्टर 'अपाचे' आणि ट्रान्सपोर्ट हेलिकॉफ्टर 'चिनूक' प्रदर्शन केले. स्वदेशी फायटर जेट तेजसशिवाय सुखोई ३० एमकेआय, मिग २९ अपग्रेड, जग्वार असे एयरक्राफ्टही परेडमध्ये आपली कामगिरी दाखवली.

 

या कार्यक्रमासंदर्भात पहिले सेना प्रमुख बिपिन रावत, भारतीय वायुदलाचे प्रमुख आर. के. सिंह भदौरिया आणि नौसेना स्टाफचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी या दिवशी वायुसेनेकडून भव्य परेड आणि एअर शो आयोजित केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील वायुसेना दिवसाच्या निमित्ताने सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विजयादशमी आणि भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेची ताकद वाढवण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0