तीन भारतीय अभियंत्यांची तालिबान्यांकडून सुटका

    दिनांक  07-Oct-2019 11:35:59


 

इस्लामाबाद : अफगाणिस्तानात काम करणाऱ्या तीन अभियंत्यांना २०१८ मध्ये तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या तीन अभियंत्यांची अखेर सोमवारी सुटका करण्यात आली आहे. तालिबान्यांनी त्यांच्या ११ म्होरक्यांच्या सुटकेविरोधात त्यांची सुटका करण्याची अट अमेरिकेसमोर ठेवली होती. या म्होरक्यांमध्ये दोन प्रमुख तालिबानी शेख अब्दुल रहमान आणि मौलवी अब्दुल रशीद यांचा सामावेश आहे.

 

एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये काम सुरू असलेल्या एका प्रकल्पात या तीन अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका झाली आहे. अमेरिकेने ११ तालिबानी नेत्यांना एअर बॅगद्वारे सोडविले आहे. २००१मध्ये तालिबानी शासनात निमरोज प्रदेशचे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. तालिबानी सुत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही अदलाबदली करण्यात आली. आता पुढील प्रक्रीया काय असेल, याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.

 

या प्रकरणी अफगाणिस्तान सरकार किंवा भारत सरकारकडून कोणतिही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ही अदलाबदली रविवारी झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानातील उत्तर बघलान प्रांताच्या ठिकाणी एका उर्जा संयंत्रात काम करणाऱ्या सात भारतीय अभियंत्यांचे २०११मध्ये अपहरण करण्यात आले होते. या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नव्हती.