स्वीस बॅंकेतील खात्यांची माहिती भारताकडे

07 Oct 2019 17:52:19
 

नवी दिल्ली : स्वीस बॅंकेत ठेवण्यात आलेल्या काळ्याधनाविरोधातील लढाईला मोठे यश मिळाले आहे. भारत आणि स्विर्त्झलँडमध्ये झालेल्या ऑटोमेटीक एक्सचेंज ऑफ इनफोर्मेशन अंतर्गत भारतीय खात्यांची पहिली यादी मिळाली आहे. यानुसार, अनेकांनी काळा पैसा लपवल्याचे उघड झाले आहे.

 

मोदी सरकारने काळ्याधनाविरोधात सुरू धडक मोहिमेला आता यश मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे आता स्विर्त्झलँडशी झालेल्या करारानुसार भारतातील संशयित खात्यांची माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्विर्त्झलँडतर्फे एकूण ७५ देशांशी हा करार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मानकाअंतर्गत ही माहिती आदान प्रदान करण्यात येणार आहे.

 

भारताला या अंतर्गत पहिल्यांदाच ही माहिती पुरविण्यात आली आहे. या मानकाअंतर्गत विविध माहिती देशांतर्गत पुरविली जाते. दरम्यान, भारताकडे सोपवण्यात आलेल्या खातेधारकांच्या माहितीत २०१८ या वर्षात बंद करण्यात आलेली खाती आणि सध्या चालू असलेल्या खात्यांची माहिती यात देण्यात आली आहे. खातेधारकांसंदर्भातील पुढील माहिती सप्टेंबर २०२०मध्ये देण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0