डोनाल्ड ट्रम्प यांचे अफलातून किस्से, जरूर वाचा...

    दिनांक  07-Oct-2019 17:33:22
 

एक आगळावेगळा राष्ट्राध्यक्ष!
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष. पण डोनाल्ड ट्रम्प म्हणलं की सामान्य माणसाला आठवतं ते त्यांना नेटकऱ्यांनी दिलेलं ट्रम्प "तात्या" हे लाडाचं नाव. चौकाचौकात देखील जेव्हा अमेरिकेबद्दल चर्चेचे फड रंगतात तेव्हा "तात्या" हा शब्द हमखास कानावर पडतोच. डोनाल्ड ट्रम्प आणि मोदीजींच्या दोस्तीचे, हातमिळवणीचे (आणि थाप म्हणून मारलेल्या चापटीचेही) किस्से जगजाहीर आहेत. 


हे माहीत आहे का?


डोनाल्ड ट्रम्प जरी राष्ट्राध्यक्ष असले तरी डोनाल्ड ट्रम्प हे मुळातले राजकारणी नाहीत. इतर राष्ट्राध्यक्षांप्रमाणे त्यांची संपूर्ण हयात ही राजकारणात गेलेली नाही. ते उद्योगपती आहेत, Trump Construtions, Trump Winery, Trump Hotels असा त्यांचा उद्योगाचा पसारा मोठा आहे. ते अब्जाधीश उद्योगपती आहेत आणि ते त्यांनी कुठेही लपवून ठेवलेलं नाही. (उमेदवारी अर्जावर पण नाही.) लपवून ठेवणे हा त्यांचा पिंड नाही.


स्वतःचं खाजगी विमान असणारा पहिला अमेरिकन राष्ट्राध्यक्षत्यांचं स्वतःचं खाजगी बोईंग विमान असून ज्यामध्ये एका अलिशान बंगल्यासारख्या सोयीसुविधा आहेत. आणि ते प्रवासात असलेलं ट्रम्प यांचं एक घरंच आहे. असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.


पहिल्यापासूनच आक्रमक
ट्रम्प हे त्यांच्या औद्योगिक कारकिर्दीपासूनच अतिशय आक्रमक आणि खडूस उद्योजक म्हणून ओळखले जातात. ट्रम्प उद्योगसमूहाची सुत्रे हातात आल्यावर त्यांनी ग्राहकाची गरज ओळखून वेगाने बाजारपेठेवर कब्जा करायला सुरुवात केली. बांधकाम व्यवसायातून सुरुवात करून त्यांनी नंतर हॉटेल आणि वाईनरी उद्योगातही यश मिळवले. हाच आक्रमकपणा त्यांच्या राजकारणातही दिसतो. मग ते Make America Great Again असो किंवा खुल्लमखुल्ला इस्लामिक दहशतवाद हा शब्द उच्चारणे असो. लोग क्या कहेंगे याचा विचार ट्रम्प यांनी कधीच केला नाही.


जेव्हा WWE मध्ये स्वतः ट्रम्प यांनी केले दोन हातFight Of The Billionaires या कार्यक्रमामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि WWE चे सर्वेसर्वा विंस मॅकमोहन यांच्या पहिलवानांमध्ये लढत रंगली आणि याच धूमश्चक्रीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि विंस मॅकमोहन यांच्यातही मुष्टियुद्ध रंगलं. हा किस्सा २००९ चा आहे. यामध्ये लढत जिंकल्यावर ट्रम्प यांनी WWE चे सर्वेसर्वा विंस मॅकमोहन यांच्यासोबत काय केलं यासाठी पहा हा व्हिडीओ.


अमेरिकेची खुली संस्कृती
सर्वात विशेष म्हणजे आता ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले याला जवळजवळ ४ वर्ष होत आलीत तरी अजूनही YouTube वर WWE च्या अधिकृत चॅनेलवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. आणि ट्रम्प यांनीही हे कृत्य केल्याचं नाकारलेलं नाही. ह्यावरून अमेरीकन संस्कृतीचा खुलेपणा दिसून येतो.


प्रतिमेच्या कैदेत न अडकणारे ट्रम्प!
ट्रम्प हे पारंपारिक राजकारणी नाहीत आणि म्हणूनच कुठल्या प्रतिमेच्या बंधनातही अडकणारे नाहीत.म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाशी निगडित मिडीयामध्ये ते नेहमी हेडलाईन ठरतात. कोण आपल्याला काय म्हणेल याचा विचारही त्यांनी आजतागायत केला नाही. राजकारणी म्हणून ते एक मनस्वी व्यक्तीमत्व आहे. विनोदाचे बेताज बादशाह पु.ल आज असते तर त्यांनी या वल्लीवर नक्कीच एक खुमासदार प्रवेश लिहिला असता हे मात्र नक्की!


-राहुल रामदास महांगरे