हे ठरले वैद्यकीय नोबेल २०१९चे मानकरी...

07 Oct 2019 16:21:26


 


नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' या विषयातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली. 'विल्यम जी. केलीन ज्युनिअर', 'सर पीटर जे रॅटक्लिफ' आणि 'ग्रेग एल. सेमेंझा' या तिघांना 'पेशी ऑक्सिजनची उपलब्धता ओळखून त्यानुसार स्वतःला कशा जुळवून घेतात' या संशोधनासाठी यावर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. यासह इतर विषयांमधील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार आहे.

 

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.

Powered By Sangraha 9.0