जम्मू-काश्मीरमध्ये नवरात्रीचा जल्लोष, पूंछमध्ये भव्य रामलीला सोहळा

    दिनांक  06-Oct-2019 21:07:54
श्रीनगर
: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यांनतर काश्मीरमधील वातावरणात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षी साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये ३७० हटविल्याच्या उत्साहाने दुहेरी रंगात आणली आहे. जम्मूमध्ये राहणाऱ्या बंगाली समुदायाने यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा उत्सव साजरा केला. हा सोहळा
'जम्मू दुर्गा पूजा समिती' आयोजित या दुर्गापूजेट माता दुर्गाचे शेकडो भक्त एकत्र आले. याच दुर्गापूजनाच्या अनुषंगाने कलम ३७० हटविण्याचा उत्सवही साजरा केला. जम्मू दुर्गा पूजा समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,जम्मूमध्ये बंगाली समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात. पहिल्यांदाच दुर्गा पूजा उत्सव साजरा केला जात आहे.


याबरोबरच नियंत्रण रेषेजवळील पुंछ जिल्ह्यात दररोज भव्य रामलीला आयोजित केली जात आहे
, तर दुसरीकडे पाकिस्तान या भागात नियंत्रण रेषेकडे सतत जोरदार गोळीबार करीत आहे. त्याच बरोबर पुंछ जिल्ह्यातील देवीच्या मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य झाली असून. लोक मोठ्या जल्लोषात सणउत्सव साजरा करत आहे.