यामुळे होतेय रोहितची चर्चा... केला 'हा' विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |



मुंबई : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये भारताने धावांचा रतीब घातला आहे. भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्माने आपला फॉर्म राखत दोन्ही डावांमध्ये शतके करून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सलामीवीर म्हणून आपल्या पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकवणारा रोहित बनला जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

 

पहिल्या डावामध्ये रोहितने मयांकसोबत त्रिशतकी भागीदारी करत १७६ धावांची खेळी केली तर दुसऱ्या डावामध्ये १२७ धावांची खेळी करून हा विक्रम आपल्या नावावर केला. यावेळी दोन्ही डावांमध्ये १३ षटकार मारून त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारामध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

 

अशी कामगिरी करणारा रोहित जगातील पहिला खेळाडू

 

रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका एकदिवसीय सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते. तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १३ षटकार ठोकले आहेत. याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही प्रकारांमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.

@@AUTHORINFO_V1@@