‘पितांबरी’चा सोनेरी विजय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |


 

आपली संस्कृती ही विजयाची संस्कृती आहे. देवांचा दानवांवर, सुष्टांचा दुष्टांवर, मंगलाचा अमंगलाव म्हणजेच जे जे वाईट, सर्वसामान्य समाजासाठी अहितकारक त्यावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो. अशी विजयाची प्रेरणा देणारा सण म्हणजे विजयादशमी!


 

अशाच प्रकारचा विजय हा आरोग्याचा अनारोग्यावर आणि स्वच्छतेचा अस्वच्छतेवर होणं आवश्यक आहे. अर्थात, हा विजय कायम राखण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक असतो अन्यथा ही अस्वच्छता सतत निर्माण होतच राहते. आपल्या रोजच्या जीवनात ही अस्वच्छता प्रामुख्याने आढळते ती स्वयंपाकघरात. स्टेलेस स्टील, अॅल्युमिनियम, लोखंड, तांबं, पितळ अशा वेगवेगळ्या धातूंची भांडी स्वयंपाकघरात वापरली जातात. या भांड्यांवर तेल-तुपाचे, जळल्या-करपल्याचे राहिल्या अन्नकणांचे असे वेगवेगळे डाग पडत असतात. ते त्वरित काढून टाकले नाहीत तर अनारोग्याला कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे देवपूजेत वापरल्या जाणाऱ्या तांब्या-पितळ्याच्या, चांदीच्या पूजासामग्रीवरदेखील वातावरणातल्या आर्द्रतेमुळे रासायनिक अभिक्रिया होऊन डाग पडतात. ही पूजासामग्री योग्य प्रकारे स्वच्छ होऊन लख्ख चमकू लागली, तर पूजेतली प्रसन्नता दुप्पट होते. या सर्व धातूच्या भांड्यांच्या परिपूर्ण स्वच्छतेसाठी उत्तम पर्याय म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर. तांब्या-पितळ्याला नव्यासारखी चमक देण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडरला गेल्या तीन दशकांपासून घराघरात प्रथम पसंती आहेच. मात्र, आता तीच पितांबरी शायनिंग पावडर तांब्या-पितळ्यासह स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, लोखंड आणि चांदी अशा सहा धातूंनाही स्वच्छ आणि नव्यासारखं चमकदार बनवते. पितांबरी शायनिंग पावडरमधील डायमंड कटिंग एज्ड कटिंग प्रॉपर्टीमुळे सर्व प्रकारचे चिवट डाग अक्षरश: कापून काढल्यासारखे दूर होतात. वेगवेगळ्या धातूच्या स्वच्छतेकरिता योग्य असे क्लिनिंग एजंट्स यात वापरण्यात आले आहेत. या सर्वांमुळे यातील स्वच्छतेची क्षमता जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. ही पावडर वस्त्रगाळ असल्याने भांड्यांवर चार पडत नाहीत. शिवाय यात कोणतंही घटक रसायन वापरलं नसल्याने हातांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यात कोणत्याही प्राणिजन्य घटकाचा वापर न केल्यामुळे देवपूजेकरिता लागणाऱ्या उपकरणांसाठीदेखील वापरता येते. याशिवाय यात केवड्याच्या व चंदनाच्या मंद सुगंधाचा वापर केला आहे. त्यामुळे भांडी स्वच्छ झाल्यानंतर वातावरणही प्रसन्न होतं, तर मग आता पितांबरी शायनिंग पावडरच्या साहाय्याने विजयादशमीच्या सुमुहूर्तावर अनुभवू या, पितांबरीचा अस्वच्छतेवर सोनेरी विजय!





 

@@AUTHORINFO_V1@@