बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध

04 Oct 2019 13:32:04



नवी दिल्ली
: भारतीय वायुसेनेने बालाकोट हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे
, ज्यामध्ये भारताने बॉम्बस्फोट करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्याचे दिसत आहे. पुलवामा येथील सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील 'जैश-ए-मोहम्मद'
या दहशतवादी संघटनांचे तळ नष्ट केले. शुक्रवारी भारतीय वायुसेनेचे नवे वायुसेना प्रमुख राकेशकुमारसिंग भदोरिया यांनी पत्रकार परिषदेत बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रोमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकची दृश्ये आहेत.



Powered By Sangraha 9.0