आर्थिक संकटात बुडालेला पाकिस्तान कर्जाच्या कचाट्यात

04 Oct 2019 12:02:24




इस्लामाबाद
: पाकिस्तान चीनला कायमच आपला मित्र म्हणून संबोधतो. यामागचे खरे कारण आहे की
, पाकिस्तानने चीनकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पेक्षाही जास्ती कर्जाचा भार पाकिस्तानवर चीनकडून घेतलेल्या कर्जाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची चांगलीच कोंडी झालेली असून, अंतर्गत अर्थव्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. कालच पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललल्याने पाकिस्तानातील २० बड्या व्यापाऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था पाक लष्कराने हातात घ्यावी याची मागणी केली. इमरान खान सरकार आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकारणातही निष्फळ ठरल्याने त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच मित्र म्हणणाऱ्या चीनच्या आर्थिक कर्जाचा भार पाकिस्तानवर वाढत चालला आहे. यामुळे पाकिस्तानवरील परकीय चलनाचे संकटही गडद होत चालले आहे.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला २०२२ पर्यंत चीनकडून घेतलेल्या ६.७ अब्ज डॉलर्सच्या इतकी कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२ पर्यंत बेलआऊट पॅकेज जाहीर केले होते. सध्या पाकिस्तानवर मोठे कर्ज असल्याकारणाने त्यांना २.८ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. या कर्जातून बाहेर पाडण्यासाठी म्हणून पाकिस्तान वारंवार चीनकडून कर्ज घेत आहे. बेल्ट अँड रोड प्रकल्पाची सुरूवात केल्यानंतर पाकिस्तावरील कर्जात वाढ झाल्याची माहिती कराचीतील ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंटच्या हाफिज फैयाज अहमद यांनी दिली. पाकिस्तानने घेतलेल्या कर्जात वाढ होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आणखी कर्ज घेत आहे. त्यामुळे कर्जामध्ये पूर्णतः बुडालेल्या पाकिस्तानला कर्ज फेडण्यासाठीही कर्जच घ्यावे लागत आहे.
Powered By Sangraha 9.0