एनसीपीए तर्फे वन वर्ल्ड मेनी म्युझिक्स: कलात्मक विविधतेचे साजरीकरण

    दिनांक  04-Oct-2019 17:34:18


नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) सादर करीत आहे- वन वर्ल्ड मेनी म्युझिक्स (OWMM). दोन दिवसीय महोत्सवाच्या या १० व्या आवृत्तीचे आयोजन १८-१९ ऑक्टोबर २०१९ रोजी एक्सप्रिमेंटल ऍंड टाटा थिएटर, एनसीपीए येथे केले जाणार आहे. या वर्षीच्या महोत्सवात अपूर्वा कृष्णा आणि ग्रुप व शरत श्रीवास्तव आणि ग्रुप या प्रसिध्द ग्रुप्समार्फत सादरीकरण केले जाणार आहे.

महोत्सवाबद्दल बोलताना डॉ. सुवर्णलता राव, हेड प्रोग्रामिंग- इंडियन म्युझिक, एनसीपीए म्हणाल्या, “विविध भारतीय संस्कृतींमधल्या शेकडो परंपरा आणि संगीताच्या प्रकारांनी आपले जग व्यापलेले आहे. एनसीपीएमार्फत वन वर्ड मेनी म्युझिक्स या महोत्सवाचे खास सृजन करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना या विलोभस संगीत प्रकारांचा अनुभव घेता येऊ शकेल. महोत्सवामध्ये संस्कृती आणि कलात्मक विविधतेच्या शांतीपूर्ण सह-अस्तित्वाला पुन:प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जाणकार वादकांना एकत्र आणले जाणार आहे. महोत्सवाच्या या आवृत्तीमध्ये दोन प्रतिभावान ग्रुप्सना प्रदर्शन करण्यासाठी आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमचा प्रेक्षकवर्ग नक्कीच या कलासंपन्न ग्रुप्सच्या प्रदर्शनाचा आनंद घेईल.

कार्यक्रमाची माहिती-

दिवस १

दिवस आणि दिनांक: शुक्रवार १८ ऑक्टोबर २०१९

कार्यक्रम: अपूर्वा कृष्णा आणि ग्रुप सादर करीत आहे: संयोग

स्थळ: एक्सप्रिमेंटल थिएटर, एनसीपीए

वेळ: सायंकाळी ७:०० पासून

कार्यक्रमाची माहिती: नावात सुस्पष्ट होत असल्याप्रमाणे, संयोग विविध संगीत परंपरेतल्या पाच निपुण तरुण वादकांना एकत्र आणत आहे. अपूर्वा कृष्णा या ग्रुपचे संचलन करीत असून, ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे कार्नेटिक वॉइलिनिस्ट आहेत. समुहामध्ये इराणी पियानिस्ट- जॅझ फ्युजन रचनाकार हेमी कैवान, पोलिश सेक्सोफोनिस्ट- रचनाकार जर्झी मेक्झिन्सी यांचा देखील समावेश आहे. ग्रुपमध्ये अनूर विनोद शाम आणि सुनाद अनूर हे दोन बहुगुणी परक्युशनिस्ट्स देखील आहेत, जे मृदंग आणि कंजिरा वाजवून साथ देणार आहेत, ते इतर परक्युसन वाद्ये देखील वाजवण्यात निपुण आहेत.

दिवस २

दिवस आणि दिनांक: शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९

कार्यक्रम: शरतचंद्र श्रीवास्तव आणि ग्रुप सादर करीत आघे: स्ट्रिंग्ज ऑफ द वर्ल्ड

स्थळ: एक्सप्रिमेंटल थिएटर, एनसीपीए

वेळ: सायंकाळी ७:०० पासून

कार्यक्रमाची माहिती: स्ट्रिंग्ज ऑफ द वर्ल्ड जगभरातल्या स्ट्रिंग्ज वाद्यांना समर्पित आहे. यात काही सर्वोत्कृष्ठ स्ट्रिंग वादकांचा समावेश आहे, ज्यांची विविध शैली, संस्कृती आणि खंडातल्या कलाकारांसोबत सहयोग करण्याची आणि अभूतपूर्व संगीतमय तसेच सांस्कृतीक अनुभूती निर्माण करण्याची क्षमता वाखाणण्यासारखी आहे शरतचंद्र श्रीवास्त हे प्रतिभावंत भारतीय क्लासिकल वॉइलिनिस्ट आणि रचनाकार आहेत.