मिथुन चक्रवर्ती संघ मुख्यालयात

    दिनांक  04-Oct-2019 19:20:25नागपूर, दि. ४ ऑक्टोबर (वृत्तसंस्था) – भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व राज्यसभेचे मा. खासदार मिथुन चक्रवर्ती यांनी गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर व पू. श्रीगुरूजी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पांजली वाहिली. तत्पूर्वी त्यांनी महाल येथील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांनी त्यांचे स्वागत केले.

(विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर स्वागत करताना )( गोळवलकर गुरूजी यांच्या स्मृतीस्थळावर)