'बाला' आता होणार या दिवशी प्रदर्शित?

    दिनांक  31-Oct-2019 16:45:17
|


आयुषमान खुराना हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार त्याच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायमच चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट 'बाला' हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. बाला या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच त्याच्या प्रदर्शनाची तारीख आता बदलली असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी ताणली जाणार आहे. बदललेल्या तारखेनुसार 'बाला' आता ७ नोव्हेंबर ऐवजी ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 'मरजावा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील तीच असल्याने तारीख बदलल्याची माहिती आज देण्यात आली आहे.

दरम्यान या बातमीसह त्याने बालामधील 'प्यार तो था' या गाण्याचा टीजर देखील प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखीनच औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या टीजरमध्ये आयुषमान चित्रपटातील दोन्ही महत्वाच्या अभिनेत्रींनबरोबर घालवलेले क्षण आठवत असताना त्याच्या चेहऱ्यावर आलेले दुःखी भाव चित्रित होत आहेत. या चित्रपटात आयुषमान एका अकाली टक्कल पडलेल्या माणसाची भूमिका रेखाटत आहे. आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या या मुलींविषयीच्या त्याच्या मनातील भावनांची छोटी झलक या १० सेकंदांच्या टीजरमधून प्रेक्षकांसमोर आली आहे.

आयुषमान बरोबर या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि यामी गौतम, सीमा पाहवा, जावेद जाफरी आणि अभिषेक बॅनर्जी महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित 'बाला' या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर या आधी प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांची प्रतीक्षा बदलेल्या तारखेमुळे आणखी वाढली आहे.