मनुष्यबळ व्यवस्थापनेतला बाहुबली : अ‍ॅड. महेंद्र गुरव

    दिनांक  31-Oct-2019 20:41:51   
|

न्याय मिळवून देता आला पाहिजे
, या विचाराने तो तरुण वकील झाला. कामगारांच्या कायद्यामध्ये निष्णात बनला. त्याने पुढे स्वत:ची व्यवस्थापन सल्लागार संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत कामगारांचे प्रश्न सोडविले जातात. हा तरुण म्हणजे ‘महेंद्र मॅनेजमेंट कन्सल्टन्सी’चे संचालक महेंद्र आत्माराम गुरव.एका नामवंत वकिलाकडे तो तरुण कामाला होता
. घरी हातभार लागेल आणि वकिलीचा अनुभव पण घेता येईल, असं त्याच्या डोक्यात घोळत होतं. त्याला वकिली क्षेत्र आवडत होतं. एक असं क्षेत्र जिथे गांजलेली व्यक्ती मोठ्या अपेक्षेने येते. ‘काळा अक्षर भैंस बराबर’ तशी कायद्याची भाषा सर्वसामान्यांसाठी अपरिचितच. कायद्याचा सर्वसामान्यांसाठी वापर झाला पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देता आला पाहिजे, या विचाराने तो तरुण वकील झाला. कामगारांच्या कायद्यामध्ये निष्णात बनला. त्याने पुढे स्वत:ची व्यवस्थापन सल्लागार संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत कामगारांचे प्रश्न सोडविले जातात. हा तरुण म्हणजे ‘महेंद्र मॅनेजमेंट कन्सल्टन्सी’चे संचालक महेंद्र आत्माराम गुरव.मूळचे संगमेश्वर
, रत्नागिरीचे असणारे आत्माराम बाळू गुरव आयुर्विमा महामंडळात ‘हेडक्लार्क’ म्हणून कार्यरत होते. पत्नी पुष्पलता आणि ८ मुलं. त्यापैकी एक महेंद्र. पार्ल्याच्या महानगरपालिकेच्या शाळेत महेंद्राचे शिक्षण झाले. पुढे पार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयातून त्याने बी.ए.ची पदवी प्राप्त केली. याचदरम्यान एका वकिलाकडे तो अर्धवेळ नोकरी करू लागला. काहीच वर्षे त्याने नोकरी केली. तिथे येणारी माणसे विविध खटल्यांनी बेजार झालेली ते पाहत. विशेषत: कामगारवर्गाचे स्वत:चे अनेक प्रश्न होते. आपणसुद्धा या कामगारांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं महेंद्रला सतत वाटे. पदवीधर झाल्यानंतर त्याने विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कामगारांसाठी काहीतरी करण्याच्या दिशेने सुरुवात झाली.दरम्यान
, १९९७ साली महेंद्रचे बाबा, आत्माराव गुरव निर्वतले. महेंद्र आणि त्याच्या कुटुंबासाठी हा फार मोठा आघात होता. पण, महेंद्रने स्वत:ला सावरले. स्वत: बाहेरची कायद्याशी संबंधित छोटी-मोठी कामे तो करू लागला. ओळखी वाढल्या. जम बसला. एकटा महेंद्र १०० ग्राहकांना सेवा द्यायचा. तेदेखील अचूक, तत्काळ अन् उत्तम. २००४च्या सुमारास मात्र, यास व्यावसायिक स्वरूप देण्याचे महेंद्र गुरव यांनी ठरवले आणि त्यातून उदयास आली ‘महेंद्र मॅनेजमेंट कन्सल्टन्सी.’ आज ‘महेंद्र कन्सल्टन्सी’मध्ये सहा कर्मचारी कार्यरत असून अडीचशेहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवली जाते. अनेक नामांकित कंपन्यांचा यात समावेश आहे.महेंद्र गुरव यांची
‘तनुश्री इंटरप्रायजेस’ नावाची अजून एक कंपनी आहे, जी मनुष्यबळ सेवा पुरविते. ३५० हून अधिक कामगारांना ही कंपनी रोजगार देते. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना ही कंपनी मनुष्यबळाची सेवा देते. येत्या काही वर्षांत या दोन्ही कंपन्यांची उलाढाल १० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा गुरव यांचा मानस आहे. मानसी यांच्यासोबत महेंद्र गुरव यांचा विवाह संपन्न झाला. या गुरव दाम्पत्याला तनुश्री आणि मोक्षा अशा दोन गोंडस मुली आहेत. साठ्ये महाविद्यालयातून वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या मानसी गुरव ‘तनुश्री इंटरप्रायजेस’च्या संचालिका आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनेच्या व्यवसायामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.‘बीएसएस’ या महाराष्ट्रीयन उद्योजकीय संस्थेसोबत त्यांचं नातं जुळलं. यामुळे अ‍ॅड. गुरव यांच्यातील उद्योजकाला एक वेगळीच झळाळी मिळाली. आपल्याप्रमाणे मराठी समाजातील मराठी तरुण उद्योजकतेकडे वळावेत म्हणून ते प्रयत्नशील आहेत. किमान १० हजार महाराष्ट्रीयन उद्योजक घडावेत, यासाठी बीएसएस ‘आंत्रप्रीन्युअर फॅक्टरी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनेच्या अनुषंगाने उद्योजक घडविण्याचा अ‍ॅड. गुरव यांचा मनसुबा आहे. याकामी बीएसएस संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त इंजिनिअर दत्ता आदाटे आणि इतर सहकार्‍यांची त्यांना मोलाची साथ मिळत आहे. मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो, पण परिस्थितीवर मात करणारे अ‍ॅड. महेंद्र गुरव हे खर्‍या अर्थाने मनुष्यबळ व्यवस्थापनेतले बाहुबली आहेत.