५० व्या इफ्फीमध्ये आशियाई चित्रपटांवर भर

    दिनांक  31-Oct-2019 11:32:52
|२०१९ मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचे ५० वे वर्ष असून आशिया खंडातला हा एक प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इफ्फीमध्ये आशियाई देशात ठसा उमटवणाऱ्या काही नव्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा विशेष विभाग राहणार असून सोल ऑफ इंडियाम्हणजे आशियाचा आत्मा असे या विभागाचे नाव राहणार आहे.

या विभागात फिलिंग्ज टु टेलहा बेन ली यांचा चिनी चित्रपट, सन चाओ यांचा समर इज द कोल्डेस्ट सिझन चींग चोंग आणि बो झांग यांनी सहदिग्दर्शित केलेला द फोर्थ वॉल, टेन इयर्स जपान हा जपानी चित्रपट, टेन इयर्स तैवान हा तैवानी चित्रपट, श्रीलंकेच्या ललिथ रत्नायके यांनी दिग्दर्शिक केलेला द अदर हाफ, सिंगापूर आणि तैवान सहनिर्मित आणि ॲथनी चेन दिग्दर्शित वेट सिझन या चित्रपटांचा समावेश आहे.

टेन इयर्स जपान आणि टेन इयर्स तैवान हा सर्वोपयोगी चित्रपट जो २०१५ मध्ये १० वर्षांच्या श्रृंखलेने सुरू होतो. या देशातल्या युवा दिग्दर्शकांनी दशकभरातल्या भोवतालच्या घडामोडीची केलेली कल्पना आणि आगामी काळातली संकटाचे केलेले अद्‌भूत चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

हे चित्रपट आशियाई देशात चित्रपट निर्मिती क्षेत्रातले धाडसी आणि चैतन्यदायी प्रयत्नांची अनुभूती देतात. चित्रपट आणि जगभरातले प्रेक्षक यांच्यातला सेतू म्हणून काम करणाऱ्या या चित्रपट निर्मात्यांचा या मंचावर ५० व्या इफ्फीमध्ये गौरव करण्यात येणार आहे.

५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ७६ देशातले २०० उत्तम चित्रपट, इंडियन पॅनोरमामध्ये २६ चित्रपट, १५ कथाबाह्य चित्रपटांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सुमारे १० हजार चित्रपट रसिक या सुवर्ण महोत्सवी इफ्फीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

इफ्फीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने २०१९ मध्ये ५० वर्ष पूर्ण होत असलेले विविध भाषांतले १२ महत्वपूर्ण चित्रपट, २० ते २८ नोव्हेंबर या काळात दाखवण्यात येणार आहेत.