पूनम महाजनांनी जागवल्या वडिलांच्या आठवणी, व्हायरल होतोय 'हा' व्हिडीओ

30 Oct 2019 17:21:12




मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या युवा खासदार व 'भाजयुमो'च्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनी स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. आज स्व. प्रमोदजी महाजन यांची ७०वी जयंती आहे.






देशाच्या राजकारणात प्रमोदजी महाजन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशभरातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पूनम महाजन यांनी प्रमोदजी महाजन यांच्या कारकिर्दीवर नजर टाकणारा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला. तसेच शेअर ही केला गेला आहे.

 


Powered By Sangraha 9.0