'कलम ३७०' हटवल्याने विकासकामांना गती : काश्मीरची रेल्वे कन्याकुमारीपर्यंत धावणार

    दिनांक  03-Oct-2019 15:58:26
 


नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी भारतीय रेल्वे मार्गाला १५ ऑगस्ट २०२२पर्यंत काश्मीरशी जोडण्याचा संकल्प केला आहे. कटरा ते बनिहार स्थानकांपर्यंत मार्गाचे काम तसेच चिनाब पूलाचे कामही वेगाने होत आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे अनेकदा कामात अडथळे येत होते. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर ही कामे वेगाने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

६५०० रेल्वे स्थानकांत वायफाय

ते म्हणाले, "सध्या पाच हजार रेल्वे स्थानकांत वायफायची सुविधा उपलब्ध आहेत. तर येत्या काळात ६५०० स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अमित शाह यांनी रेल्वे सुरक्षेवर भर दिला आहे. रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही सेवा आणि सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत."

 

काश्मीर सर्वात जास्त विकसित शहर बनेल : अमित शाह

वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी गृहमंत्री अमित शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी काश्मीर हे सर्वात जास्त विकसित राज्यांपैकी एक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याची सुरुवात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवून करण्यात आली आहे.