नितेश राणेंचा भाजपप्रवेश : कणकवलीतून उमेदवारी

    दिनांक  03-Oct-2019 14:25:56


 


कणकवली : आमदार नितेश राणे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कणकवलीतून ते भाजपचे आमदार असतील. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा प्रवेश रखडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अखेर नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी त्यांनी कणकवलीतील भाजप कार्यालयात जाऊन सदस्यत्व घेतले.

 

जठार-राणे एकत्र

कणकवलीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच राणे यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान नितेश राणे यांनी वादळापूर्वीची शांतता, फक्त काही तास बाकी, असे ट्विट करत सुतोवाच केले होते. दरम्यान आता खासदार नारायण राणेंच्या अधिकृत भाजपप्रवेशाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.