"तुरुंगातल्या जेवणाची सवय नाही! चार किलो वजन घटले" : चिदंबरम

    दिनांक  03-Oct-2019 17:43:30नवी दिल्ली : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना यांना अखेर घरचे जेवण देण्यास सीबीआयने परवानगी दिली आहे. आपल्या जामीन याचिकेत अर्ज करताना त्यांनी मला तुरुंगातील जेवणाची सवय नाही, त्यामुळे माझे चार किलो वजन घटले आहे, त्यामुळे घरचे जेवण देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत.

 

७४ वर्षीय चिदंबरम यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांनी आज केली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात आरोपी आहेत. २१ ऑगस्ट रोजी त्यांना कोठडी देण्यात आली आहे.