यशं देही, जयं देही... अतुल भातखळकर यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
03 Oct 2019 11:42:58
मुंबई : भाजपतील एक अभ्यासू नेता, अशी ओळख असलेले आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 'भारत माता कि जय'च्या घोषणा देत सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे हजारो कार्यकर्ते यांची रॅली या मतदार संघातून निघाली. अशोक नगर येथील स्वयंभू गणेश मंदिरापासून त्यांनी रोड शोला सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी भातखळकर यांचे उत्साहात स्वागत केले.