उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आदित्य बाळासाहेबांपुढे नतमस्तक

03 Oct 2019 11:21:31



मुंबई : आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन वरळी मतदार संघात करण्यात आले. आदित्य ठाकरे मातोश्रीहून अर्ज भरण्यासाठी सकाळी रवाना झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबीरीसमोर नतमस्तक झाले. हा फोटो ट्विट करत त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.




दरम्यान, वरळी येथून अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या आदित्य यांच्या रोड शोमध्ये बंधू तेजस ठाकरे, आई रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेते व पदाधिकारी सहभागी झाले. वरळी विधानसभा मतदार संघातील अनेक महिलाही या रॅलीत सहभागी झाल्या. सकाळपासूनच वरळी विधानसभा मतदार संघात उत्साहाचे वातावरण होते.


 
Powered By Sangraha 9.0