
मुंबई
: आदित्य ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत जे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आता रिमोट कंट्रोलद्वारे सत्ता चालविण्याची परंपरा मोडीत काढली. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.
हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत रोड शो करत आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. ठाकरे कुटुंबातील कोणीही यापूर्वी निवडणूक न लढविल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल फक्त तर्क वितर्कच चर्चिले जात होते परंतु आदित्यच्या उमेदवारीने याबाबतची माहिती समोर आली आहे.