भारत VS दक्षिण आफ्रिका : १ बाद ३२४ धावा

03 Oct 2019 11:44:12


भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेआधी थांबवावा लागला. दरम्यान आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून भारत १ बाद ३२४ धावांवर खेळत आहे. आजच्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर अखेर दक्षिण आफ्रिकेला रोहितची आणि मयंकची जोडी तोडण्यात यश मिळाल्यामुळे रोहित शर्मा २३९ बॉल्समध्ये तब्बल १६६ धावा करून बाद झाला आहे.

भारतीय संघातील मयंक अगरवाल कालपासून आजपर्यंत भारताची खिंड लढवत असून त्याच्या नाबाद १३८ धावा झाल्या आहेत तर नव्या दमाचा गडी असलेला चेतेश्वर पुजारा ६ धावांवर खेळत आहे. दरम्यान नुकताच लंच टाइम झाल्यामुळे तूर्तास खेळ थांबवण्यात आला असून त्यानंतर भारताची कलामगिरी बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कालपासून सुरु झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कालचा संपूर्ण दिवस भारतासाठी धमाकेदार ठरला. मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा यांच्या अप्रतिम खेळीने चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ कसा रंगतो हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.

Powered By Sangraha 9.0