मयांकच्या द्विशतकाने भारत मजबूत स्थितीत

    दिनांक  03-Oct-2019 17:43:04विशाखापट्टणम : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघाने मोठी मजल मारली आहे. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्माच्या त्रिशतकीय भागीदारीनंतर भारताने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५०२ धावांवर डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने एवढी मोठी मजल मारली.

 

पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने २४४ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकार खेचून १७६ धावा केल्या, तर मयांकने ३७१ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकारांसह २१५ धावा झोडपल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने ६, कर्णधार विराट कोहलीने २० आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १५ धावांची खेळी केली. अखेर भारताने १३६ षटकात ७ बाद ५०२ धावांवर पहिला डाव घोषित केला.

 

पाठलाग करताना आफ्रिका अडकली अश्विनच्या जाळ्यात

 

५०२ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद ३९ अशी दयनीय स्थिती झाली. यामध्ये आर. अश्विनने २ बळी टिपले तर जडेजाने १ बळी टिपला. सध्या आफ्रिकेच्या संघात फाफ डुप्लेसी वगळता जास्त अनुभवी खेळाडू नसल्याने त्याचा फटका संघाच्या खेळीमध्ये होत आहे.