आदित्य ठाकरेंची बीएमडब्ल्यू अवघ्या ६ लाखांचीच ?

03 Oct 2019 20:33:48


 


आदित्य पुन्हा ट्रोल : वयाच्या २९व्या वर्षी ११ कोटी संपत्ती कशी कमवायची हे बेरोजगार तरुणांनाही शिकवा!

 

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला. यावेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा अहवाल दिला. त्या अहवालामध्ये सादर केलेल्या त्यांच्या बीएमडब्ल्यूच्या किमतीवर आदित्य ठाकरे हे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहेत. यामध्ये ६० लाखांच्या बीएमडब्लूची किंमत फक्त ६ लाख ५० हजार एवढी दाखवण्यात आली आहे.

 

आदित्य ठाकरे यांच्याकडे बीएमडब्ल्यू ५३० ग्रँड टुरिझमो ही गाडी आहे. ज्याची बाजारातील किंमत ६० लाखांच्या घरात आहे. तरीही त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये या गाडीची किंमत ६ लाख ५० हजार एवढीच दाखवली आहे. त्यामुळे ६० लाखाच्या गाडीची किंमत ६ लाख ५० हजार कशी? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. याबाबत अद्याप त्यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नसून यावर ते काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच सादर केलेल्या अहवालात आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे माहिती दिली आहे.

 

आदित्य ठाकरेंची संपत्ती ११ कोटी ३८ लाखांवर...

 

बँक ठेवी - १० कोटी ३६ लाख

बॉन्ड शेअर्स- २० लाख ३९ हजार

वाहन - बीएमडब्ल्यू कार

एमएच - ०९ सीबी - १२३४

किंमत - ६ लाख ५० हजार

दागिने- ६४ लाख ६५ हजार

इतर - १० लाख २२ हजार

एकूण - ११ कोटी ३८ लाख

Powered By Sangraha 9.0