युतीतील तणाव वाढला ! शिवसेना-भाजप बैठक रद्द

    दिनांक  29-Oct-2019 18:37:38
|मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान सत्ता वाटपाबद्दल शब्द दिला नसल्याचे म्हणतात शिवसेना आता आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे ही बैठक रद्द झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे युतीतील तणाव आणखी शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही ठाम आहोत, असेही राऊत म्हणाले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'सामना'वरील टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "भाजपच्या विरोधात आम्ही एकही ओळ लिहीलेली नाही. आम्ही मोदी समर्थक असलो तरीही आम्ही शरद पवारांचे कौतूक केले आहे. त्यात आमचं काय चुकलं, असेही राऊत म्हणले.