बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण भाऊबीज

    29-Oct-2019
Total Views | 36



दिवाळीचा पाडवा काल साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे. भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते
, तर बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे. दरम्यान, पाडवा आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर काल एसटी बस गाड्या तसंच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी दिसून आली.

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला हा दिव्याचा सण देशभर खूपच उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या शुभारंभ झालेल्या या सणाचे स्वागत प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. मग काही जण आपली कला सादर करून सणाचा आनंद लुटतात, घरी गोडा धोडाचे करून, लक्ष्मीचे पूजन करून तसेच आपल्या आप्तेष्टांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. आणि अशा तर्हेने दिवाळीचा हा हवाहवासा वाटणारा सण कंदील, दिव्याची आरास आणि रोषणाई करून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

देशातच नाही तर देशभरसुद्धा आजकाल दिवाळी खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि आपल्या जवळच्या लोकांबरोबर काही काळ आनंदाने राहण्यासाठी, रोजच्या व्यस्ततेतून थोडासा वेळ आपल्या कुटुंबियांसाठी सुद्धा दिला जातो. अशा सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सणांचे महत्व खूप आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121