सुवर्णसाठ्याची कोणतीही विक्री केलेली नाही : आरबीआय

27 Oct 2019 20:03:12



मुंबई : मंदीच्या सावटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारला आर्थिक मदत केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुवर्णसाठाही विक्रीला काढल्याच्या वृत्ताचा रविवारी बँकेने इन्कार केला. ‘आरबीआय’ने कोणत्याही प्रकाच्या सुवर्णसाठ्याची विक्री केली नसल्याचे रविवारी स्पष्टीकरण दिले.

 
 
 
 

रिझर्व्ह बँकेने तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री केली, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. त्याबाबत रविवारी रिझर्व्ह बँकेने ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले. यात ‘आरबीआय’ने कोणत्याही प्रकरचा सुवर्णसाठ्याची विक्री केली नसल्याचे म्हटले. ‘आरबीआय’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. पण ‘आरबीआय’कडून सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापारही केला जात नाही,’ असे ‘आरबीआय’ने स्पष्ट केले.

Powered By Sangraha 9.0