कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान काश्मीरात

    दिनांक  27-Oct-2019 16:40:47
|
 


नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा उत्साह असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही जवानांसह दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात बालाकोट येथे पोहोचले आहेत. हा क्षण जम्मू काश्मीरसह देशवासीयांसाठीही खास आकर्षण असणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी या भागात जाणार असल्याने साऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.

 
 
 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोहोचताच जवानांना मिठाई वाटप केले. जवानांशी हस्तांदोलन करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी जवानांशी संवादही साधला. यापूर्वी पंतप्रधान भारत-चीन सीमा जवान आणि आयबीटीपी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१४ मध्ये त्यांनी सियाचीन येथे जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 

 

दरम्यान, मोदींच्या दौऱ्यानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. दिवाळीनिमित्त जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा कडक ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर २४ तास नजर ठेवून संशयित हालचाली टीपण्याची जबाबदारी पोलीसांनना देण्यात आली आहे.