मुरलीधर देशपांडे यांचे निधन

    दिनांक  27-Oct-2019 20:51:32
|नाशिक : रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कार्यकर्ते योगेश देशपांडे व महारांगोली कार्यकर्ते निलेश देशपांडे यांचे वडिल तसेच, शंकराचार्य न्यासचे विश्वस्त अवधूत देशपांडे यांचे सासरे मुरलीधर देशपांडे यांचे शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.

 

मुरलीधर देशपांडे हे एक मितभाषी दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. मुळचे आंबेजोगाई येथील प्रतिथयश शेतकरी असणारे मुरलीधर देशपांडे यांचे बालपण व शिक्षण आंबेजोगाई येथे झाले. स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. प्रमोद महाजन यांचे ते वर्ग मित्र होते.

 

शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सकाळीच त्यांनी वाढदिवस त्यांच्या मित्राबरोबर अत्यंत साधेपणे साजरा केला. घरी देखील मुले व नातवंडां सोबत वाढदिवस साजरा केला. व त्याच रात्री त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले.