अमेरिकेच्या हल्ल्यात अल-बगदादी ठार

    दिनांक  27-Oct-2019 21:00:39
|
 
 
 

वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याची शक्यता रविवारी वर्तविण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ’आताच काहीतरी मोठे घडले आहे’ असे ट्विट केल्याने याबाबत तर्क-वितर्क लढविण्यास सुरुवात झाली. बगदादी ठार झाल्याच्या शक्यतेचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी रविवारी दिले.