काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला ; ६ जवान जखमी

26 Oct 2019 21:21:33




श्रीनगर
: श्रीनगरमधील करण नगर भागात दहशतवाद्यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकाला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहा जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सीआरपीएफचे तपासणी पथक नाक्यावर गस्त घालत असताना हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेड हल्ला करून हे दहशतवादी फरार झाले आहे. हल्ल्यानंतर तात्काळ कारण नगर भागात नाकेबंदी करून पोलीस तपास करत आहेत. सर्व जखमी जवान सीआरपीएफच्या १४४ व्या बटालियनमध्ये सेवेत असल्याचेही सांगण्यात आले.

Powered By Sangraha 9.0