दिवाळीच्या सुट्टीत नवीन गोष्टी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

    दिनांक  26-Oct-2019 15:50:36
|
 


मुंबई : दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासह या दरम्यान नवनवीन गोष्टी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. ही सुट्टी छोटी असली तरी बहुतांशी विद्यार्थी पुढील अभ्यासाच्या तयारीसह नवीन भाषा, क्रीडा, संबंधित नवी कौशल्ये, आर्ट, क्राफ्ट कुकींगसह विविध नवनवीन गोष्टी शिक्षणासाठी आपल्या सुट्टीचा सदुपयोग करीत असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या पीअर टू पीअर कम्युनिटीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कोणत्या योजना असतात हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

 

या सर्वेक्षणात समाविष्ट मुंबईतील बहुतांशी (३६ टक्के) मुलांनी उत्तर दिले की, ते या दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग आगामी सेमिस्टरच्या तयारीसाठी करतील, तर २७ पेक्षा जास्त मुलांनी सांगितले की, ते हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतील आणि २१ टक्के पेक्षा जास्त मुले आपल्या कुटुंबियांसह प्रवासाला जाणार आहेत. मुंबईतील ५५टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सांगितले की, या सुट्टीत ते अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतील, ज्यात विविध विषयांचे संशोधन असून हे विषय अभ्यासक्रमाच्या बाहेरील असतील. तर जवळपास ७२टक्के मुलांनी सांगितले की, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सुट्टीसाठी जो अभ्यास दिला आहे, तो वेळेत पूर्ण करण्यावर त्यांचा भर असेल. यावरून हे सूचित होते की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या या सुट्टीसाठी काही वेगळ्या योजना असल्या तरीही, अभ्यासाची चिंता आणि उपाययोजना त्या बहुतांशी मुलांसाठी अग्रक्रमावर आहे.

 

ब्रेनलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिचल बोर्कोव्स्की म्हणाले, “दिवाळीच्या सुट्टीचे हे दिवस कसे व्यतीत करायचे याबाबत सर्व जण काही ना काही योजना आखत असतो. ही गोष्ट शाळकरी मुलांसाठीही तितकीच खरी आहे. ते या सुट्टीचा उपयोग मौज मस्तीसाठी तर करतीलच पण त्याचबरोबर आपली कौशल्ये, क्षमता अधिक धारदार करण्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी देखील ते आपला वेळ आणि ऊर्जा खर्ची घालतील. आमच्या संशोधनाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी केलेल्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून आम्ही काही लक्षणीय साम्ये आणि पॅटर्न शोधल्या. आम्ही नेहमी या माहितीचा उपयोग ब्रेनली मार्फत अधिक मूल्यवान शिक्षण देण्यासाठी करतो आणि अभ्यास ही गोष्ट अधिक सहयोगपूर्ण, आकर्षक आणि आनंददायक करण्याकडे आमचा कल असतो. या सर्वेक्षणात देशभरातील खास करून टीअर २ आणि टीअर ३ शहरातील १२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश होता. आगामी सुट्टीच्या संदर्भातील मुलांचे विचार व त्यांच्या मिश्र प्रतिक्रिया या सर्वेक्षणाने नोंदल्या आहेत.