जेम्स बॉंड इस बॅक...!

    दिनांक  26-Oct-2019 11:01:23
|


जेम्स बॉंड या चित्रपटाविषयी आणि त्यामध्ये जेम्स बॉंड ही ऐतिहासिक ठरलेली भूमिका साकारणाऱ्या डॅनिअल क्रेग विषयी सर्वांनाच आकर्षण असते. आणि हाच सर्वांना भावणारा जेम्स बॉंड पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. औत्सुक्याचे गोष्ट म्हणजे पाईनवूड स्टुडिओजमध्ये सुरु असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. स्वतः डॅनिअल क्रेगने सोशल मीडियावर सर्वांना याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वांचे डोळे पुन्हा एकदा जेम्स बॉंड चित्रपटातील ऍक्शन सिक्वेन्सकडे, त्याच्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वाकडे लागणार आहेत.


दरम्यान या चित्रपटाशी संबंधित नो टाइम टू डाय असा हॅशटॅग देखील सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
James Bond 007 परत आला आहे त्यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास नक्कीच उत्सुक असतील. या चित्रपटासह जेम्स बॉंड चित्रपटाने आत्तापर्यंतच्या २५ जेम्स बॉंड भूमिकांचे चित्रीकरण केले आहे. पुढील वर्षी ३ एप्रिल ला James Bond 007 भारतात प्रदर्शित होईल असेही आज जाहीर करण्यात आले.डॅनिअल क्रेगने जेम्स बॉंड या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. त्याच्या अभिनायाने मग त्यामध्ये त्याचे ऍक्शन सिक्वेन्स असुदे, त्याचे प्रसंगावधान, त्याची डायलॉग्सची शब्दफेक या सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि म्हणूनच आज इतकी वर्ष होऊन देखील जेम्स बॉंड ही भूमिका प्रेक्षकांना तितकीच आवडते.