डहाणू, तलासरीला पुन्हा भूकंपाचे धक्के

    दिनांक  26-Oct-2019 17:11:57
|

पालघर
: जिल्हयातील तलासरी, डहाणू तालुक्यांत भूकंपाचे सत्र सातत्याने सुरूच असून शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी कासा ,चारोटी, पेठ, शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. गेल्या दीड वर्षापासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे सौम्य स्वरूपाचे धक्के बसल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.


शुक्रवारी रात्री ६ सौम्य स्वरूपाचे धक्के तर शनिवारी पहाटेपर्यंत २ धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे
. २.६, २.०, २.०, २.४ ,१.८, १.९ रिस्टर स्केल क्षमतेचे ६ धक्के बसले. या अगोदरही पालघरमधील विविध जिल्ह्यांत आत्तापर्यंत अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंतीना तडे गेल्याने नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे आहेत. महिना भर किंवा दिवसेंदिवस होणारे भूकंप हे इथल्या लोकांना भयभीत करून सोडत आहेत.