विजेत्या भाजप आमदारांना राम नाईक यांच्या शुभेच्छा!

    दिनांक  25-Oct-2019 20:01:38
|

मुंबई
: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची त्यांच्या गोरेगाव कार्यालयात भेट घेऊन भारतीय जनता पार्टी गोरेगावचे रहिवासी नवनिर्वाचित आमदार अतुल भातखळकर व विद्या ठाकूर यांनी आशीर्वाद घेतले. निवडणूक निकालानंतर प्रथमच भेटीला आलेल्या या दोघांचेही अभिनंदन करून नाईक यांनी त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.यावेळी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमध्ये आमदार भातखळकर यांनी राम नाईक यांच्या १९७८ च्या पहिल्या विधानसभा विजयाची आठवण काढली
. त्यावेळी वयाने खूपच लहान होतो. पण वृत्तपत्रांत ‘गोरेगाव नेत्यांचे गाव’ अशी बातमी आल्याचे आठवत असल्याचे ते म्हणाले. त्यावर नाईक यांनी सांगितले की, १९७८च्या विधानसभा निवडणुकीत गोरेगाव निवासी असलेले चारजण निवडून आले होते. एक स्वत: राम नाईक बोरीवलीतून, प.बा. सामंत गोरेगावातून, कमल देसाई मालाडमधून तर सत्येंद्र मोरे हे धारावीतून आमदार म्हणून निवडून आले.त्यावेळी विधान परिषदेवर पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रा
. ग.भा. कानिटकरही गोरेगावातच राहाणारे होते आणि तत्कालीन खासदार मृणाल गोरेही गोरेगावकरच होत्या. त्यामुळे सहा जनप्रतिनिधी राहात असलेले गोरेगाव नेत्यांचे गाव आहे अशी तेव्हा बातमी आली होती. या सहाजणांपैकी आता फक्त माजी राज्यपाल राम नाईक हयात असले, तरी आजही गोरेगावातच एक खासदार गजानन कीर्तिकर, दोन विधान परिषदेतील आमदार सर्वश्री सुभाष देसाई व कपिल पाटील, तर काल दुसर्‍यांदा विधानसभेवर निवडून आलेले तिघे विद्या ठाकूर, अतुल भातखळकर व सुनील प्रभू गोरेगावातच राहातात. आजही गोरेगाव नेत्यांचेच गाव आहे, अशा हलक्याफुलक्या गप्पाही झाल्या. काही नवनिर्वाचित आमदारांनी विशेषतः उत्तर मुंबईतील आमदारांनी दिवसभरात नाईक यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले.