दिवाळीत रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’ नाही

    दिनांक  25-Oct-2019 19:26:15
|मुंबई : रेल्वेचा दर रविवारचा मेगाब्लॉक या रविवारी २७ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आलेला आहे. रविवार नेहमीप्रमाणे उपनगरी गाड्या धावतील असे मध्य रेल्वेने आज जाहिर केले आहे. रविवारी दिवाळीतील लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठा आणि कार्यालये सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे व स्नेह्यांकडे ये-जा करणार्‍या उननगरी प्रवाशांची वाहतुक वाढेल अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.

तर सोमवारी दिवाळीतील पाडवा (बलीप्रतिपदा) असल्याने या दिवशी बर्‍याच आस्थापनांना सुई असणार आहे. मात्र दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाहतुक वाढेल असा अंदाज असल्याने सोमवारी रविवारीय वेळापत्रकानुसार उपनगरी गाड्या धावतील असेही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहिर केले आहे. तसेच संगणकीय आरक्षण केंद्रे रविवारीय वेळापत्रकानुसार दुपारी दोनपर्यंतच सुरू राहतील. मात्र आरक्षण केंद्रांवरील काही खिडक्या आपत्कालीन परिस्थितीसाठी चालू राहणार आहेत.